मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या दिशेने विराट एक्सप्रेस सुसाट

केपटाउन । आज भारत विरुद्ध दक्षिण वनडेत कर्णधार कोहलीने वनडे कारकिर्दीतील ३४वे शतक केले. याबरोबर त्याने सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्वतःमधील शतकांचे अंतर १५वर आणले आहे.

विराटने २०५ वनडे सामन्यात खेळताना तब्बल ५७ च्या सरासरीने ९२८६पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे वनडेत त्याने ९९ षटकार मारताना ४५ अर्धशतकेही केली आहेत.

या मालिकेतील हा तिसरा सामना असून विराटचा वनडेतील एकंदरीत फॉर्म पाहता तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडेतील ४९ शतकांकडे वेगाने जात आहे.

सचिन तेंडुलकरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून विराटने आजपर्यंत सर्वप्रकारात ५५ शतके केली आहेत.