रॉजर फेडररचा नवा विश्वविक्रम

रॉजर फेडररने काल गेरी वेबर ओपनमध्ये पहिल्याच फेरीत विजय मिळवत कारकिर्दीतील ११०० विजय मिळवला. विम्बल्डनला दोन आठवडे बाकी असताना फेडररने आपल्या या ग्रास कोर्टवरील अभियानाची जोरदार सुरुवात केली.

आजपर्यंत या स्पर्धेत ८ विजतेपद रॉजर फेडररने पटकावली असून काल त्याने पहिल्या फेरीत युतीची सुगीताचा ६-३, ६-१ असा पराभव केला.

यापूर्वी जिमी कॉनर्स यांनी १२५६ विजेतेपद टेनिस कारकिर्दीत मिळवली आहे. रॉजर त्या विक्रमापासून १५६ विजेतेपद दूर आहे. गेल्याच आठवड्यात स्टुटगार्ड ओपेनमधून पहिल्याच फेरीत बाहेर पडलेल्या फेडररने या स्पर्धेत चांगलं कमबॅक केलं.

आता फेडररच्या नावावर ग्रास कोर्टवर १५३ विजय आणि २४ पराभव आहेत. फेडररच्या ११०० विजयात ६८१ विजय हार्ड कोर्टवर, २१४ विजय क्ले कोर्टवर, १५३ विजय ग्रास कोर्टवर आणि ५२ विजय कार्पेट मिळवले आहेत.

पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे पहिले १० खेळाडू:
१२५६ जिमी कॉनर्स
११०० रॉजर फेडरर
१०६८ इवान लेंडल
९२९ गुलेर्मे विलास
८७७ जॉन मकेन्रो
८७० आंद्रे आगासी
८४७ राफेल नदाल
८०१ स्टिफेन इडबर्ग
७८० लिए नास्तासि
७७५ नोवाक जोकोविच

एकेरीमध्ये १००० पेक्षा जास्त विजेतेपद जिंकणारे खेळाडू
१४४२ मार्टिना नवरातिलोवा
१३०४ ख्रिस एडव्हर्ट
१२५६ जिमी कॉनर्स
११०० रॉजर फेडरर
१०६८ इवान लेंडल