- Advertisement -

जय जय शिव शंभो; हॅपी बर्थडे जंबो, सेहवागकडून कुंबळेला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा !

0 311

 

आज भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे आपला ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. कुंबळेला यामुळे अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कायम हटके ट्विट आणि व्यक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या वीरेंद्र सेहवागनेही कुंबळेला ट्विटरवरून खास शुभेच्छा दिल्या आहे.

सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर भारताचे मोठे धन असणाऱ्या अनिल कुंबळेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय शिव शंभो, हॅपी बर्थडे जंबो !”

आज दिवाळीतील धनत्रयोदशीचे औचित्य साधून सेहवागने ह्या खास शुभेच्छा कुंबळेला दिल्या आहेत.

भारताकडून कुंबळेने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कुंबळेने भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही यशस्वीपणे सांभाळले आहे.

प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यापासून हा माजी दिग्गज खेळाडू आजकाल जास्त चर्चेत नव्हता.

गेल्याच आठवड्यात ४ दिवसीय कसोटी क्रिकेटला मान्यता दिलेल्या आयसीसीच्या तांत्रिक समितीचा अध्यक्ष कुंबळे अध्यक्ष आहे. आपल्या वर्तनातून या खेळाडूने क्रिकेटजगतावर मोठी छाप सोडली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कुंबळेला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन म्हणतो, ” वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिल कुंबळे. तू खेळत असलेल्या काळातील आणि सध्याच्या काळातील अनेकांचा आदर्श आहेस. “

Comments
Loading...
%d bloggers like this: