तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…

२२ जूलै २०१९ अर्थात आज क्रिकेटमधील त्या खास दिवसाला ११ वर्ष होत आहेत. जगातील ज्या गोलंदाजांचे नाव घेतले तर फलंदाजांची भांबेरी उडत होती त्या मुथय्या मुरलीधरन आजच्याच दिवशी गाॅल कसोटीत भारताविरुद्ध पारंपारिक क्रिकेटला अलविदा केला. तोही कसोटी क्रिकेटमधील ८००वी विकेट घेऊन.

आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेटला अवलिदा करताना मुरलीने या सामन्यात असा एक विक्रम प्रस्थापित केला जो कदाचीत भविष्यात कुणी मोडणे केवळ अशक्यच ठरेल. भारताच्या ११व्या क्रमांकावरील फिरकीपटू प्रग्यान ओझाला बाद करत मुरलीने आपल्या कारकिर्दीला टाटा बाय बाय केले. पाचव्या दिवसातील काही तासात डावातील वैयक्तिक ४५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ओझाला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या माहेला जयवर्धनेकडे झेल द्यायला भाग पाडत मुरलीने आपला हा बळी घेतला. तसेच आपल्या सोनेरी कारकिर्दीचा सोनेरी शेवटही केला.

चौथ्या दिवसाच्या शेवटी भारतीय संघाची अवस्था ५९.३ षटकांत ५ बाद १८१ होती. आणि सामना वाचविण्यासाठी पाचवा दिवस खेळून काढायचा होता. मैदानावर धोनी-लक्ष्मण जोडी खेळत होती. प्रतिस्पर्ध्याच्या ५ विकेट बाकी तर मुरलीच्या खात्यात कारकिर्दीतील ७९८ विकेट्स जमा झाल्या होत्या. यातील दोन विकेट मलिंगाने तर मुरलीने एक विकेट घेतल्यावर शेवटच्या दोन विकेट बाकी असताना मुरलीला विक्रमाला केवळ १ विकेटची गरज होती. परंतु तेवढ्यात लक्ष्मण धावबाद झाला आणि मुरलीचा विक्रम हुकतोय की काय असे वाटत होते. परंतु कोणतीही संधी न दवडता मुरलीने भारताच्या जवळपास ५० चेंडू खेळलेल्या ओझाला बाद करत ही संधी तर साधलीच. परंतु कधीही मोडला जाणार नाही असा एक अशक्यप्राय विक्रम नावावर केला.

हा सामना पुढे लंकेने १० विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली परंतु याच मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राखत तर तिसरा सामना जिंकत भारताने जोरदार कमबॅक केले आणि मुरली संघात नसताना लंकेच्या संघाची काय अवस्था होऊ शकते याची झलक दाखवुन दिली. आजही मुरली संघात नसला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय वेळोवेळी लंकेला येत असेलच. याच कसोटीनंतर लंकेच्या सत्तेला खऱ्या अर्थाने धक्का बसला आणि पुढे जयवर्धेने, दिलशान आणि संगकाराच्या निवृत्तीनंतर हा संघ रसातळाला गेला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान

१९ दिवसात ५ सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमा दासवर होतोय दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव

विश्वचषक जिंकल्यानंतरही ओयन मॉर्गन म्हणतो ही गोष्ट योग्य नाही