तेव्हा सचिन, द्रविड आणि गांगुलीने केल्या होत्या एकाच डावात शतकी खेळी!

आज त्या गोष्टीला १५ वर्ष झाली जेव्हा भारताच्या तीन महान फलंदाजांनी एकाच डावात शतकी खेळी केल्या होत्या. २००२ साली २२ ते २६ ऑगस्ट रोजी लीड्स येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात या तीनही फलंदाजांनी शतकी खेळी केल्या होत्या.

सामान्यांच्या पहिल्या दिवशी राहुल द्रविडने २२० चेंडूत तब्बल ३०० मिनिटे फलंदाजी करताना १०० धावा केल्या होत्या. त्यांनतर १४८ धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी जरी द्रविड बाद झाला असला तरी सचिनने आपले शतक साजरे केले. त्यासाठी त्याने १७१ चेंडूचा सामना केला. त्यानंतर गांगुलीनेही १६७ चेंडूत १२८ धावांची खेळी केली.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या तीन दिग्गजांनी एकाच डावात शतकी खेळी करण्याचा हा पहिला आणि शेवटचा योग होता. विशेष म्हणजे ही कसोटी भारताने १ डाव आणि ४६ धावांनी जिंकली होती.