सेहवागने करून दिली झहीरला या गोष्टीची आठवण

आज भारताचा माजी गोलंदाज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्यावर अनेक माजी संघासहकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपल्या हटके स्टाइल शुभेच्छा देण्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सेहवागने झहीरलाही खास शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु याबरोबर एक खास आठवण करून दिलीय ती म्हणजे #LastBachelorsBirthday.

“भारताच्या एका दिग्गज गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. क्रिकेटबद्दल तज्ञ असलेल्या या ज्ञान बाबाला शुभेच्छा. #LastBachelorsBirthday” असे सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

 

याचा नक्की अर्थ काय हे माहित नाही. परंतु याचे तसे दोन अर्थ निघतात. पहिला म्हणजे ह्याच वर्षात झहीरचा साखरपुडा बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे बरोबर झाला आहे. त्यामुळे पुढचा वाढदिवस हा लग्न झाल्यानंतर साजरा होईल.

दुसरा अर्थात वीरेंद्र सेहवाग जेव्हा खेळत होता तेव्हा त्याच्या सहकार्यांपैकी सर्वांची लग्न झाली आहेत. त्यात युवी, भज्जी, माही आणि गौती या सेहवागच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यातील एक शेवटचा संघासहकारी हा झहीर आहे ज्याच अजून लग्न झालेलं नाही.