हा आहे आयपीएल २०१८मधील एक सर्वोत्तम कॅच!

आज राजस्थान राॅयल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात सुरू असलेल्या सामन्यात पंजाबच्या मयांक अग्रवालने अप्रतिम झेल घेतला. परंतु हा झेल घेताना त्याचा तोल जात आहे हे ध्यानात येताच त्याने चेंडू जवळच क्षेत्ररक्षण करत असलेल्या मनोज तिवारीकडे फेकला. त्यानेही प्रसंगावधान राखुन हा झेल घेतला.

त्याचे झाले असे १३व्या षटकात मुजीब उर रहेमान गोलंदाजी करत होता. तेव्हा स्फोटक फलंदाज बेन स्टोक्सने त्याचा एक चेंडू थेट सीमारेषेवर मारला.

Read- गेल्या ७ सामन्यात मुंबईच करतेय कोलकात्यावर राज्य

तिथे क्षेत्रररक्षण करत असलेल्या मयांक अग्रवालने हा झेल टिपला. परंतु तोल जात आहे हे ध्यानात आल्यावर त्याने तो मनोज तिवारीकडे दिला.

या झेलची चर्चा सोशल मीडियावर काही क्षणात सुरु झाली. काहींनी तर याला या मोसमातील सर्वोत्तम झेल म्हटले.

Read- भारतीय संघात नाही मिळाले स्थान पण आयपीएलमध्ये घालतोय धुमाकूळ

काही चाहत्यांच्या मते हा झेल घेण्यासाठी कष्ट घेतले मयांकने परंतु झेल नावावर लागला मनोज तिवारीच्या.