प्रो कबड्डी: अटातटीच्या सामन्यात दिल्ली ठरली दबंग

काल प्रो कबड्डीमध्ये पहिला सामना दबंग दिल्ली आणि तामिल थालयइवाज या संघात झाला होता. अत्यंत अटातटीचा झालेला हा सामना दबंग दिल्लीने ३०-२९ असा जिंकला. दिल्लीकडून मेराजने ९ गुण मिळवले. त्याला रोहित बलियान याने उत्तम साथ दिली. तामिल थालयइवाजसाठी स्टार खेळाडू अजय कुमारने १४ गुण मिळवले त्यातील १३ रेडींग गुण होते. उत्तम कामगिरी करूनही तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
पहिल्या सत्रातील पहिले काही मिनिटे दबंग दिल्ली वरचढ होती. त्यानंतर सामना गुणांवर चालू होता. दहाव्या मिनिटाला सामना ६-६ असा होता. १७ व्या मिनिटाला सामना ९-९ अशा स्थितीत होता. पहिले सत्र संपले तेव्हा सामना १२-१२ अश्या स्थितीत होता. दोन्हीपैकी कोणताही संघ आघाडी कायम करू शकला नाही.

दुसऱ्या सत्रात सुरुवातीला तामिल थालयइवाजने आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात पाचव्या मिनिटाला तामिल थालयइवाज १७-१३ असे आघाडीवर होते. १३ व्या मिनिटाला दिल्ली ऑल आऊट झाले. सामना २५-२२ असा तामिल थालयइवाजच्या बाजूने झुकला होता.

सामना संणपण्यास २ मिनिटे शिल्लक असताना मेराजने सुपर रेड करत सामन्याचे चित्र बदलले आणि सामना ३०-२८ असा दिल्लीच्या बाजूने झुकवला. अजय ठाकूरने खूप प्रयन्त केले पण त्यांना यश आले नाही. तामिल थालयइवाजने रेडींगमध्ये मिळवलेल्या १४ गुणांपैकी १३ गुण अजय ठाकूर याने मिळवले आहेत. त्याला साथ मिळाली नाही म्हणून तामिल थालयइवाजहा सामना २९-३० असा हरली.

दिल्लीचा हा ६ सामन्यात केवळ दुसरा विजय आहे. या संघाचे १३ गुण असून हा संघ ‘झोन ए’ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.