दिडशतकी खेळीनंतरही असा नकोसा विक्रम करणारा चेतेश्वर पुजारा दुसरा भारतीय

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 450 धावांचा टप्पा पार केला आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे.

भारताच्या या डावात आज चेतेश्वर पुजाराने 373 चेंडूत 193 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 22 चौकार मारले. मात्र तो द्विशतक करण्यापासून फक्त 7 धावांनी वंचित राहिला. त्याला 130 व्या षटकात नॅथन लायनने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले.

त्यामुळे कसोटीमध्ये 193 धावांवर बाद होणारा पुजारा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये 193 धावांवर बाद झाला आहे. सचिन 2002 मध्ये इंग्लंड विरुद्ध लीड्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात 193 धावांवर पहिल्या डावात बाद झाला होता.

त्याचबरोबर पुजारा हा कसोटीमध्ये 190-199 या धावांदरम्यान बाद होणारा एकूण आठवा भारतीय फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

या कारणामुळे सिडनी कसोटीत भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बांधली हाताला काळी पट्टी

एकाच षटकात या फलंदाजाने काढल्या ३४ धावा, केली डिविलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

हेडन- सचिनला जे १० वर्षांपुर्वी जमल ते पुजाराने आता करुन दाखवलं