अजब! १४० वर्षात कसोटीत झाला नाही असा कारनामा आज झाला

क्रिकेट आणि विक्रम ही आता नित्याचीच बाब झाली आहे. आज बांगलादेश विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशसंघाकडून एक खास विक्रम झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असलेल्या बांगलादेशकडून पहिली दोन्ही षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली.

अब्दूर रझाक आणि मेहीडी हसन या दोन फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशाकडून डावाची सुरुवात केली. १४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याची पहिली दोन षटके फिरकी गोलंदाजाने टाकायची ही केवळ दुसरी वेळ होती.

विशेष म्हणजे हा निर्णय योग्य ठरवताना अब्दूर रझाकने १४ षटकांत ५९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कानपुर कसोटीत १९६४ साली भारताकडून सामन्यातील पहिली दोन षटके ही फिरकी गोलंदाजांनी टाकली होती.