टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही.

हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलस्टेर कूकचा १६०वा सामना आहे. १६० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो जगातील केवळ ७वा तर इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

१६० कसोटी सामन्यात कूकने ४५.११च्या सरासरीने १२२२५ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ३२ शतकांचा समावेश आहे.

सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने २०० कसोटी सामने खेळले आहेत.

कोणत्याही पुर्णवेळ गोलंदाजाने कारकिर्दीत १६० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले नाहीत.

जॅक कॅलिस हा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने कसोटीत १६६ सामने खेळले आहेत. भारताकडून सचिन (२००) आणि राहुल द्रविड (१६४) यांनी सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

२००- सचिन तेंडूलकर

१६८- रिकी पाॅटिंग

१६८- जॅक कॅलिस

१६६- जॅक कॅलिस

१६४- राहुल द्रविड

१६४- शिवनारायण चंद्रपाॅल

१६०- अॅलस्टेर कूक

महत्त्वाच्या बातम्या-

 पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड