२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट

भारतात झालेल्या 2011 चा विश्वचषक एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला . हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने भारताच्या या विजयात मोलाचे योगदान दिले होते.

या विश्वचषकासाठी 16 जणांचा भारतीय संघ जाहिर झाला होता. या संघात एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, आर अश्विन, पियुष चावला, गौतम गंभीर, हरभजन सिंग, झहिर खान, विराट कोहली, प्रविण कुमार, अशिष नेहरा, मुनाफ पटेल, युसुफ पठाण, सुरेश रैना आणि एस श्रीसंत यांचा समावेश होता.

या 16 जणांपैकी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या गौतम गंभीरने काल(4 डिसेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

त्याच्याप्रमाणेच 2013 नंतर विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, झहिर खान, प्रविण कुमार, अशिष नेहरा आणि मुनाफ पटेल यांनीही एकेक करत निवृत्ती स्विकारली आहे. या निवृत्त झालेल्या बऱ्याच खेळाडूंनी आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद सांभाळणेही पसंत केले आहे.

पण या विश्वचषकातील काही खेळाडूंना मात्र खराब कामगिरीमुळे भारतीय वनडे संघातील स्थानही गमवावे लागले आहे.

भारतीय वनडे संघातील स्थान गमवाव्या लागलेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, आर अश्विन, पियुष चावला,  हरभजन सिंग, युसुफ पटेल आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे. तसेच श्रीसंतवर 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे.

त्यामुळे या 16 जणांपैकी सध्या भारताच्या वनडे संघात धोनी आणि कोहली हे दोन आजी-माजी कर्णधारांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला

पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने उपकर्णधारालाच दिला डच्चू

सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?