वाचा गांगुलीला कोणता अनुभव जीवनात खूप महत्त्वाचा वाटतो !

सौरव गांगुली म्हटलं की आपल्याला एकतर तो कर्णधार म्हणून किंवा एक समालोचक म्हणून कायम आठवतो. परंतु हा दिग्गज क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एक उत्तम प्रशासक म्हणूनही पुढे आला आहे. यामुळे कोलकाता येथे टी२० विश्वचषक सामन्यांचं आयोजन ही गांगुलीला एक जीवनातील महत्त्वाची गोष्ट वाटते.

सप्टेंबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर गांगुलीने बंगाल क्रिकेट असोशिएशन अर्थात कॅबची जबाबदारी सांभाळली. त्यांनतर २०१६मध्ये लगेच भारतात टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. एक प्रशासक म्हणून गांगुलीसाठी ही एक मोठी जबाबदारी होती.

याबद्दल बोलताना हा दिग्गज म्हणतो, ” मी ४०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. परंतु विश्वचषक सामन्यांचं आयोजन करणं हा जीवनातील एक खास आणि डोळे उघडणारा अनुभव आहे.

इडन गार्डनवर विश्वचषकाचे ५ सामने खेळवले गेले होते ज्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्याचाही समावेश होता.