जय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु

भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकरने आपली विनोद कांबळीशी खास मैत्री असल्याचे म्हटले आहे.

फ्रेंडशिप डेच्या मुहुर्तावर विनोद कांबळीने एक ट्विट केला होता. “तू मैदानावर महान आहेच परंतु मैदानाबाहेर तू जय तर मी विरु आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी मला तूला सांगायचं आहे की ये दोस्ती हम नही छोडेंगे. तोडेंगे दम मगर तेरा साथ न छोडेंगे.” असे कांबळी आपल्या ट्विटमध्ये सचिनला म्हटले होते.

यावर सचिननेही आपल्या या खास मैत्रीला उजाळा दिला होता. “तो एक जबरदस्त चित्रपट (शोले) होता आणि आपली मैत्री खास आहे. माझा तू असा विचार करणे विशेष आहे माझ्या मित्रा.” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-कपिल देव शतकात एकदाच जन्माला येतो

-मी विराटला सल्ला दिलाच नाही