दुसरी कसोटी: भारताला पाचवा मोठा झटका !

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाला पाचवा झटका बसला आहे. शतकवीर अजिंक्य रहाणे १३२ धावांवर बाद झाला आहे.

अजिंक्य रहाणेच्या रूपाने पुष्पाकुमाराला कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळाली आहे. यष्टीरक्षक डिकवेल्लाने पुष्पाकुमाराच्या गोलंदाजीवर रहाणेला यष्टिचित केले आहे.

या खेळीत रहाणेने तब्बल २२२ चेंडूंचा सामना केला.

सध्या भारत ११६.१ षटकांत ४३५/५ असून अष्टपैलू आर अश्विन ४३ वर तर यष्टीरक्षक वृद्धिमान सहा १४ धावांवर खेळत आहेत.