७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४

पल्लेकेल: कालच्या १ बाद १९ वरून पुढे खेळ सुरु करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ७ षटकातच २ मोहरे गमवावे लागले आहे. सकाळच्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर करुणरत्ने आणि पुष्पाकुमारा हे दोन फलदांज बाद झाले आहेत.

१६व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर काल नाबाद असलेला करुणरत्ने १६ धावांवर बाद झाला. त्याने रहाणेकडे झेल दिला. दुसरा फलंदाज पुष्पाकुमारा वृद्धिमान सहाकडे शमीच्या गोलंदाजीवर झेल देऊन १ धावेवर बाद झाला.

सध्या लंका ३ बाद ३४ वर असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना ३१७ धावांची गरज आहे.