भारत वि. श्रीलंका: श्रीलंका संघाला दुसरा मोठा झटका

कोलकाता । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात दिमुठ करुणरत्ने पाठोपाठ सदिरा समरविक्रमालाही वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तंबूत धाडले आहे. ७.१ षटकांत श्रीलंका संघाची २ बाद ३४ अशी अवस्था झाली आहे.

आज भुवनेश्वर कुमारने दिमुठ करुणरत्नेला ५व्या षटकात वृद्धिमान सहाकडे झेल देण्यास भाग पाडले तर ७व्या षटकात सदिरा समरविक्रमाला एलबीड्ब्लु केले.

तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात श्रीलंकन गोलंदाजांना भारतीय संघाला बाद करण्यात यश आले.

भारताकडून चेतेश्वर पुजारा (५२), वृद्धिमान सहा (२९), मोहम्मद शमी (२४) आणि रवींद्र जडेजा (२२) यांनी थोडाफार प्रतिकार केला. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४), लिहूरू गामागे (२), दशुन शनका(२) आणि दिलरुवान परेरा (२) यांनी विकेट्स घेतल्या.