पहा आफ्रिदीची ४३ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी

काउंटी ग्राउंड, डर्बी: काल हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान येथे झालेल्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी करत आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

डर्बीशायरचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून हॅम्पशायरला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. हॅम्पशायरकडून शाहिद आफ्रिदी आणि कॅल्विन डिकिसॉन यांनी सलामीवीर म्हणून मैदानात पाऊल ठेवले. त्यांनतर आफ्रिदीने अशी काही फटकेबाजी केली की विचारू नका. आपल्या १०१ धावांच्या खेळीत त्याने १० चौकार आणि ७ षटकार खेचले. १०१ पैकी तब्बल ८२ धावा आफ्रिदीने चौकार आणि षटकार यांच्या मदतीने केल्या.

पहा ही शतकी खेळी: