अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पुण्यातील 200हुन अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पुण्यातील एकुण  25 संघांमध्ये 200हून अधिक हौशी खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि.डिसेंबर 2018 पासून सुरू होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे  आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव  आनंद परांजपे म्हणाले कीपीएमडीटीएचे अध्यक्ष व टेनिसप्रेमी कै. अरुण साने यांच्या स्मरणार्थ  ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत  सध्याचा खेळाडूमाजी खेळाडू अथवा मार्कर्स यांचा सहभाग नसून हौशी स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेत एकुण  40हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.  दोन्ही संघामध्ये होणाऱ्या लढतीत एकुण 3सामन्यांचा समावेश असून यात 2 सामने खुल्या दुहेरी गटाततर उर्वरित एक सामना 80वर्षावरील(दोन्ही खेळाडूंचे मिळून वय 80वर्षवरील)गटात होणार आहे. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून हि स्पर्धा घेण्यात आल्याचे क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले.

स्पर्धेमध्ये एमडब्ल्युटीए ए, इमेरार्ड, पीसीएलटीए, लॉ चार्जस्, सोलारीस टु, गोल्डन बॉयज्, मॉर्निंग स्टार्स, एफसी सी, एमडब्ल्युटीए बी, ओडीएमटी, डायमंडस्, एफसी लेजेन्डस्, खतरनाक, सोलारीस गो गेटर्स, महाराष्ट्र मंडळ, लॉ कॉलेज लायन्स, एफसी ए, रुबी, सोलारीस सी, डेक्कन लायन्स, एमडब्ल्युटीए ऑसेस, सफायर, टेनिसनट्स, सोलारीस आरपीटीए, डेक्कन वॉरियर्स हे 25 संघ झुंजणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सुंदर अय्यरअभिषेक ताम्हाणेहेमंत बेंद्रेउत्सव मुखर्जीजयंत कढे आणि कौस्तुभ शहा यांचा सहभाग आहे.