आयकॉन प्रोजेक्ट करंडक पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत 200 हुन अधिक खेळाडू सहभागी

0 73

पुणे, 19 मे 2017:  ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित आयकॉन प्रोजेक्ट  करंडक पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत पुणे परिसरातील विविध क्लब आणि भागातून 200 हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस(एमटी)टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे दि.22 ते 26 मे 2017 या कालावधीत होणार आहे. 


तसेच, ही स्पर्धा 8 वर्षाखालील मिश्र गट, 10, 12 वर्षाखालील मुले व मुली या गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि पीएमडीटीए गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: