या गोलंदाजाच्या असभ्य हावभावांमुळे चाहत्यांचा हल्लाबोल

8 आॅगस्टपासून सुरु झालेल्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाचा वेगवान गोलंदाज सोहिल तन्वीरकडून बेन कटिंगला बाद केल्यानंतर असभ्य हावभाव करण्यात आल्याने चाहत्यांनी ट्विटरवरून त्याच्यावर हल्लाबोल केला आहे.

हा सामना गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियॉट्स यांच्यात 9 आॅगस्टला पार पडला.

या सामन्यात नेविस पॅट्रियॉट्स प्रथम फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात तन्वीर गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर कटिंगने षटकार मारला पण त्याच्या पुढच्याच चेंडुवर त्याला तन्वीरने त्रिफळाचीत केले.

तन्वीरने कटिंगला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना मधले बोट दाखवून सेंडआॅफ दिला. त्याच्या या असभ्य हावभावामुळे आॅस्ट्रेलियाचा आणि त्रिनबॅगोचा क्रिकेटपटू ख्रिस लिननेही ट्विट करत तन्वीरवर टीका केली आहे.

या सामन्यात वॉरियर्सने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

नेविस पॅट्रियॉट्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 146 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने 65 चेंडूत 86 धावा करताना 7 चौकार आणि 5 षटकार मारले.

मात्र नेविस पॅट्रियॉट्सने दिलेले 147 धावांचे आव्हान वॉरियर्सने 16.3 षटकातच यशस्वी पूर्ण केले. वॉरियर्सकडून शिर्मोन हेटमेयारने अर्धशतक करत विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्याने 45 चेंडूत नाबाद 89 धावा केल्या.

तसेच या सामन्यात 18 वर्षीय संदिप लामिच्छानेने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीचेही सोशल मिडियावर कौतुक होत आहे. त्याने नेविस पॅट्रियॉट्सकडून खेळताना 4 षटकात 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते