मारुती सुझुकी दक्षिण डेअरला सुरुवातीच्या दिवशी गौरव गिलला आघाडी

दवांगेरे (कर्नाटक) । भारताचा आघाडीची रॅली चालक गौरव गिलने मारुती सुझुकी दक्षिण डेअरच्या 10 व्या सत्रात सुरुवातीच्या दिवशीच चमक दाखवली. द महिंद्रा अ‍ॅडव्हेंचरचा चालक असणा-या गौरवने सह चालक मुसा शेरीफसह विशेष स्तरामध्ये 2:25.47 मिनिट वेळेसह बाजी मारली.

आपला संघ सहकारी फिलिपोस मथाई (नेव्हीगेटर व्हीव्हीएस मूर्थीसह) 2:30:19 मिनिट वेळेसह दुसरे स्थान पटकावले. अमित्रजित घोष ( अश्‍विन नाईकसह) महिंद्रा अ‍ॅडव्हेंचरपासून काही सेकंदाने पिछाडीवर राहिले. त्यांनी 2:30:24 अशी वेळ नोंदवली.

दुचाकी गटात युवा कुमारने सुरुवातीच्या दिवशी 1:43:30 वेळेसह अव्वल स्थान मिळवले. विश्‍वास एस डी याने 1:48:22 वेळेसह दुसरे तर, आकाश ऐथलने 1:49:29 वेळेसह तिसरे स्थान पटकावले.दक्षिण डेअरच्या पहिल्या फेरीत कार्सना तीन विशेष स्तरात (डर्ट/ग्रॅवेल) 129 किमीचे अंतर पार केले तर, बाईकर्सना दोन विशेष स्तरात 86.42 किमी अंतर होते.

गिलने पहिल्या विशेष स्तराला धिम्या गतीने सुरु केली असली तर, नंतर त्याने आपला फॉर्म दाखवला. पण, येथे गाडी चालवणे सोपे नसून आव्हानात्मक असल्याचे गिल म्हणाला. आम्हाला ट्रॅकच्या अडथळ्यांसदर्भात अधिक माहिती नव्हती. त्यामध्ये आम्ही सावधपणे जाण्याचा निर्णय घेतला असे गिलने स्पष्ट केले.

गतविजेत्या टीम मारुती सुझुकीच्या सुरेश रानाला सुरुवातीला अडथळ्याला सामोरे जावे लागले. पण, त्यामधूनही सावरत त्याने चमक दाखवली. त्याच्या गाडीला पंक्‍चर झाल्याने त्याला सात मिनिटांचा तोडा सहन करावा लागला. त्याने दिवसाच्या शेवटी चौथे स्थान मिळवले.त्यामुळे येणा-या चार दिवसात तो चमक दाखवण्यास सज्ज असेल. 2000 किमी लांब असलेल्य दक्षिण डेअर ही कर्नाटक, महाराष्ट्र येथून जात गोवा येथे संपते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही

राशिद खान खेळणार या मोठ्या क्रिकेट लीगमध्ये