धोनी आणि पंकज अडवाणीच्या बाबतीत घडला एक खास किस्सा

2 एप्रिल ला राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी एमएस धोनी आणि पंकज अडवाणी यांना हा देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2009 चा पद्मश्री पुरस्कार पण एमएस धोनी आणि पंकज अडवाणी यांना सोबत मिळाला होता.

याबद्दल  पंकज अडवाणीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने असे लिहले,” धोनी तुला भेटुन खुप आनंद झाला. पद्मभूषण पुरस्कार  मिळाल्याबद्दल अभिनंदन! यावरून असे दिसते की, आपल्याला पद्म पुरस्कार मिळण्याची वेळ खुपच अचूक आहे.”

धोनी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०१३ ची चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली आहे.

तसेच २००७ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही त्याचा सन्मान करण्यात आला होता. पद्मभूषण पुरस्कार स्विकारण्यासाठी धोनी त्याच्या लेफ्टनंट कर्नलच्या गणवेशामध्ये उपस्थित होता.

19 वेळेचा विश्वविजेता असलेल्या पंकज अडवाणीने भारताचे नेतृत्व करताना बिलीयर्डस् आणि स्नूकर या दोन्ही प्रकारात मोठी कामगिरी केली आहे.

तसेच त्याला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले होते.