Video: हिटमॅन रोहित शर्माने ती गोष्ट केली तर ऑस्ट्रेलियन कर्णधार होणार मुंबई इंडीयन्सचा सपोर्टर

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मामधील मजेदार संवाद स्टंप माइकमधून ऐकायला मिळाला आहे.

झाले असे की भारताचा पहिला डाव सुरु असताना 139 व्या षटकादरम्यान अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजी करत होते. त्याचवेळी रोहितचे लक्ष विचलित करण्यासाठी यष्टीरक्षक पेन यष्टीमागून सतत काहीतरी बोलत होता.

तसेच यावेळी पेन रोहितला म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’

पेनच्या या बोलण्याकडे लक्ष न देता रोहित फलंदाजी करत होता. मात्र त्याचे हे वाक्य ऐकून समालोचकांनाही हसू आवरता आले नाही. त्याचबरोबर पुढे पेन असेही म्हणाला, ‘पण राजस्थानकडून खूप ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळतात.’ यावर ऍरॉन फिंच म्हणाला, ‘मी पण रॉयल्सकडून खेळलो आहे.’

फिंचच्या या वाक्यावर उत्तर देताना पेन म्हणाला, ‘तू सगळ्याच संघासाठी खेळला आहेस, मित्रा’ त्यावर फिंच म्हणाला ‘फक्त बेंगलोर सोडून’

पेनची ही यष्टीमागीलचे बोलणे पुढी षटकातही चालू होते. तसेच याआधीच्या सामन्यांमध्येही पेन यष्टीमागून फलंदाजांचे लक्ष विचलित करण्यासाठी बडबड करताना दिसून आला आहे.

या सामन्यात रोहितने 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या खेळीत रोहितने एकही षटकार मारलेला नाही. हे त्याचे एकही षटकार न मारता केलेले पहिले अर्धशतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर

कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स

शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले