लाजिरवाण्या विक्रमापासून पाकिस्तान संघ थोडक्यात वाचला

काल पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यात पाकिस्तान संघाला १८३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलँड संघाने दिलेले २५८ धावांचे लक्ष पार करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर सर्वबाद झाला.

या विजयाबरोबर न्यूझीलंड संघाने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. फहीम अशरफ (10), सरफराज अहमद (14*), मोहम्मद आमिर (14) आणि रुम्मन रईस (16) या फलंदाजांना केवळ दुहेरी धावसंख्येचा आकडा पार करता आला. न्यूझीलँडकडून चांगली गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने ५ विकेट्स घेतले तर त्याला कॉलिन मुनरो आणि लोकी फर्ग्युसन यांनी २-२ विकेट्स घेत चांगली साथ दिली.

१९९२ साली पाकिस्तान संघ ७४ धावांवर सर्वबाद झाला होता. तर जानेवारी १९९३ मध्ये त्यांना विंडीजने ७१ धावांवर ऑल आऊट केले होते. फेब्रुवारी १९९३ मध्ये हाच संघ पुन्हा ४३ धावांवर विंडीजविरुद्ध केपटाउनमध्ये सर्वबाद झाला होता.

पाकिस्तानची ही वनडेतील तिसरा नीचांकी धावसंख्या आहे. तर २५ वर्षातील ही त्यांची धावसंख्या आहे.