चेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव

पाकिस्तान येथील मरदनमध्ये एक क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटर झुबेर अहमदला डोक्यावर बाउन्सर लागल्याने जीव गमवावा लागला आहे. १४ ऑगस्टला फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला एक उसळता चेंडू येऊन लागला. अहमदने आजवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ सामने खेळले होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ट्विटर वरून ही माहिती दिली. त्यात त्यांनी फलंदाजांनी हेल्मेट घालणे किती आवश्यक आहे हे ही सांगितले.

पहा काय आहे तो ट्विट.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्याच बरोबर त्याच्या संघातील खेळाडूंनीही ट्विट करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माझी खेळाडू आणि समालोचक डीन जोन्सने ही त्याला श्रद्धांजली दिली आहे.

त्या गोष्टीला आता जरी ३ वर्ष होऊन गेले असले तरी ऑस्ट्रलियाच्या क्रिकेटर फिल ह्यूज जेव्हा अश्याच दुखापती मुळे प्राण गमवावे लागले होते तेव्हा संपूर्ण क्रिकेट जग हादरून गेले होते आणि अजूनही सगळ्यांच्या मनात फिलच्या आठवणी ताज्या आहेत. फलंदाजने खेळताना हेल्मेट व बाकी सुरक्षेच्या गोष्टी घालणे किती आवश्यक आहे हे तेव्हा सर्वांना जाणवले होते.