थेट घरी जा सांगणाऱ्या अाफ्रिदीला त्याने दिले असे काही उत्तर की, अाफ्रिदीलाही मागावी लागली माफी

पाकिस्तान सुपर लीगमध्ये परवा असे काही झाले की ज्यामूळे सोशल मीडियापासून सर्वत्र याची जोरदार चर्चा झाली. शाहीद अाफ्रिदीने जेव्हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) एका तरूण खेळाडूला बाद केले तेव्हा त्याने केलेले सेलीब्रेशन कूणालाच अावडले नाही. 

सैफ बदर ह्या खेळाडूने अाफ्रिदीला एका चेंडूवर षटकार खेचला आणि त्याच्याच पूढच्या चेंडूवर अाफ्रिदीने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यावेळी आफ्रिदीने त्याला बोट दाखवत रस्ता दाखवला. 

सैफ बदर यामूळे चांगलाच हादरला. काही वेळ तर त्याला काय करावे हेही सूचत नव्हते. परंतू नंतर तो डगआउटमध्ये गेला. अाफ्रिदी सारख्या अनूभवी खेळाडूची ही कृती पाहून सोशल मिडीयावर त्याला जोरदार ट्रोल करण्यात आले. 

शेवटी सैफ बदरनेच ट्वीट करत “तरीही माझ अापल्यावर प्रेम आहे शाहीद भाई” असे म्हटले. 

यावर भावुक होत पाकिस्तानच्या या दिग्गजानेही या खेळाडूची माफी मागत खेळताना अस होत तसेच तो तरूण खेळाडूंना कायम पाठींबा देतो असा ट्वीट केला. तसेच सैफ बदरला शुभेच्छाही दिल्या.