टी२० मालिकेत पहिल्यांदाच एकाच संघाचे दोन उप-कर्णधार खेळणार

24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-20  मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची निवड झाली आहे. अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली 14 जणांच्या संघाची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या संघात  मिचेल मार्श आणि अॅलेक्स केरी ह्या दोन खेळाडूंची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. टी-20 मध्ये दोन उपकर्णधरासंह खेळण्याची  क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ आहे.

आक्रमक सलामीवीर ख्रिस लिन खांद्याच्या दुखापतीमधून सावरला असून त्याला 14 जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतीमधून सावरलेला अनुभवी वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलला संघात स्थान देण्यात आले आहे.

मात्र फिरकी गोलंदाज फवाज अहमदला राष्ट्रीय संघात जागा मिळण्यासाठी अजून वाट पहावी लागणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलने त्याचे संघातील स्थान टिकवून ठेवले आहे. त्याला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी संघातून आधीच वगळण्यात आले आहे.

या संघात नॅथन लायनला स्थान  देण्यात आले असून तो जानेवारी 2016 नंतर पहिल्यांदाच टी-20 सामन्यात खेळणार आहे.

फिंचने या आधी झिम्बाॅब्वेविरूद्धच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. फिंच हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

युएईत होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-20  मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 24, 26 आणि 28 ऑक्टोबरला  टी-20 सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया टी -20 संघ-

अॅरॉन फिंच (कर्णधार), मिशेल मार्श(उपकर्णधार), अॅलेक्स केरी(उपकर्णधार), अॅशटन अगर, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, नाथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, डिआरसी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मिशेल स्टार्क, अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा, बेन मॅकडर्मॉट.

महत्वाच्या बातम्या-