आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका

एशिया कप स्पर्धेत भारताविरूद्ध झालेल्या सलग दोन सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्विकारावे लागले. त्यानंतर बांगलदेशसोबतच्या सामन्यात या संघाने सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खडबडून जागे झाले आहे.

आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या युएईत होणाऱ्या  मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमिरला संघातून वगळले आहे. गुरूवारी(27 सप्टेंबर) पाकिस्तनच्या संघाची पहिल्या दोन कसोट्यांसाठी 17 खेळाडूंची  निवड झाली.

26 वर्षीय अमिरने 5 वर्षाच्या बंदीनंतर जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पुनरागमन केले होते. एशिया कप स्पर्धेत त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.

याशीर शाह या लेग स्पिनरवर पाकिस्तानची मुख्य धुरा असणार आहे. त्याने 2014 मध्ये युएई मध्ये झालेल्या मालिकेत त्याने 12 बळी मिळवले होते. ती मालिका पाकिस्तानने 2-0 ने जिंकली होती.

त्याच्या शिवाय संघात 19 वर्षीय शादाब खान आणि 33 वर्षाचा ऑफ स्पिनर बिलाल असिफला संघात स्थान देण्यात आले आहे. बिलाल अजून एकही कसोटी सामना खेळला नसून त्याने फक्त 3 वन-डे सामने खेळले आहेत.

निवड समितीचे मुख्य सदस्य इन्झमाम-उल-हक यांनी सांगितले की युएईमधील परिस्थितीनुसार संघाची निवड केली आहे. त्या  ठिकाणी पाकिस्तान 2009 पासून सातत्याने  क्रिकेट खेळत आहे.

वाहब रियाज आणि मीर हामजा या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे यासिर, शादाब आणि असिफ या तीन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आल्याचे इन्झमामने सांगितले.

पहिला कसोटी सामना 7 ऑक्टोबरपासूूून दुबईत होणार असून त्यानंतर दुसरा कसोटी सामना अबुधाबीत 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी संघाची निवड नंतर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तानचा 17 सदस्यीय संघ-

सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, फखार जमन, इमाम-उल-हक, बाबर आझम, असद शफीक, हरिस सोहेल, उस्मान सलाउद्दीन, यासिर शाह, शदाब खान, बिलाल असिफ, मोहम्मद अब्बास, हसन अली, वहाब रियाझ, फहीम अशरफ , मीर हमझा, मोहम्मद रिजवान.

महत्वाच्या बातम्या-

-एशिया कप २०१८: अंतिम सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम

-एशिया कपमध्ये सचिनने केले होते शतकांचे शतक; पण टीम इंडियाचा झाला होता नकोसा पराभव