पाकिस्तानला हरवत बांग्लादेशाची अंतिम सामन्यात धडक

अबुधाबीतील शेख झायेद मैदानात पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात एशिया कप 2018 मधील सेमी फायनल सदृश्य मुकाबला काल (26 सप्टेंबर) झाला. सुपर फेरीचा हा अंतिम सामना दोन्ही संघासाठी करा किंवा मरा या स्वरुपाचा होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशाची सुरुवात अडखळत झाली. त्यांचे 3 फलंदाज अवघ्या 12 धावा फलकावर लागलेल्या असताना बाद झाले होते. त्यानंतर मिशफिकुर रहीम आणि मोहम्मद मिथुन यांनी चौथ्या गड्यासाठी 144 धावांची भागिदारी केली.  मिशफिकुरने शानदार 99 धावांची खेळी केली तर 60 धावा करत मिथुनने त्याला मोलाची साथ दिली.

त्यानंतर बांग्लादेशाचा डाव 48.5 षटकात 239 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून जुनेद खानने 9 षटकात अवघ्या 19 धावा देत 4 विकेट मिळवल्या.

बांग्लादेशने ठेवलेल्या 240 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताने पाकिस्तनाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. मेहदी हसनच्या पहिल्याच षटकात 5 व्या चेंडूवर फकर जमानने आपली विकेट गमावली. त्यानंतर दुसऱ्या षटकात मिस्तफिजुर रेहमानने बाबर आझमला पायचीत करत पाकिस्तानला अडचणीत आणले.

पाकिस्तीनचा कर्णधार सरफराज अहमद देखील स्वस्तात बाद झाला. एका बाजूने  इमाम-उल-हक लढत असताना दुसऱ्या बाजूने गडी बाद होत गेल्याने पाकिस्तानचा पराभव झाला. इमामची 105 चेंडूतील 83 धावांची खेळी वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाचा खेळपट्टीवर निभाव लागू शकला नाही.  त्यांचा डाव 50 षटकात 202 धांवावर स्थिरावला.

या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 28 सप्टेंबरला  बांग्लादेशाचा मुकाबला भारताशी होणार  आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुल म्हणाला, मी ती गोष्ट करायला नको होती…

भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट

टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम