टॉप ५: पाकिस्तानात खेळणार हे ५ निवृत्त खेळाडू !

मागील काही काळात पाकिस्तान मधील क्रिकेट खूप अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि राजकीय तणावाने २००९ पासून देशामध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. तथापि, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये पुन्हा चालू झाले जेव्हा झिम्बाब्वेने २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला.

विश्व ११ आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होणारी टी-२० मालिका मागील एका दशकातील पाकिस्तानात होणारी सर्वात मोठी मालिका आहे. हि मालिका केवळ चाहत्यांसाठीच महत्वाची नसेल, तर यावरून पाकिस्तानमधील क्रिकेटचे भविष्यही ठरणार आहे. अनेक निवृत्त व खेळत असलेले खेळाडू या मालिकेत भाग घेणार आहेत.

विश्व् ११ संघातील पाच निवृत्त क्रिकेटपटूंवर नजर टाकूयात.

५. पॉल कॉलिंगवूड

३ जानेवारी २०११ला ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कॉलिंगवूडने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. २००१ ते २०११ असा त्याचा १० वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कॉलिंगवूड नेहमीच इंग्लंडसाठी एक महत्वाचा फलंदाज राहिला आहे.

फक्त फलंदाज म्हणून कॉलिंगवूडची ख्याती नव्हती तर तो एक चपळ क्षेत्ररक्षक ही होता. मधल्या फळीतील एक विश्वसनीय फलंदाज असण्याव्यतिरिक्त, कॉलिंगवुडने कारकिर्दीत गोलंदाजी सुद्धा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर माजी इंग्लिश अष्टपैलू क्रिकेटपटू ड्यूरमसाठी नियमितपणे काउंटी क्रिकेट खेळत आहे. म्हणून या टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी कॉलिंगवूड चांगल्या स्थितीत आहे. गेल्याच महिन्यात कॉलिंगवूडने शतकी खेळी देखील केली आहे.

४. ग्रँट इलियट

ग्रँट इलियटची न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच कमी होती. तथापि, अल्पकाल कारकिर्दी दरम्यान, या किवी अष्टपैलूने बॉल आणि बॅट दोन्ही प्रभावित केले आहे. ग्रँटने क्रिकेटमध्ये धावा कमवण्यासाठी पुस्तकी क्रिकेटचाच वापर केला. ग्रँट गोलंदाजी करताना महत्वाच्या वेळी विकेट काढायचा. ग्रँट २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

टी -२० क्रिकेट खेळण्यासाठी तो अजूनही योग्य खेळाडू आहे आणि वर्ल्ड इलेव्हन संघासाठी तो एक महत्वाचा फलंदाज असणार आहे.

३. डॅरेन सॅमी

कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचा प्रतिनिधित्व करणारा डॅरेन सॅमी हा सेंट लूसियाचा पहिला क्रिकेटपटू होता. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या संघाचं टी-२० मध्ये ही नेतृत्व केले आहे.

त्याने २०१२ आणि २०१६ मध्ये वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषक जिंकून दिले आहेत. सॅमीने गेल्या एप्रिल २०१६ मध्ये वेस्टइंडीजसाठी शेवटचा सामना खेळला आहे होते परंतु तो जगभरातील टी-२० स्पर्धेत सक्रिय असतो. नुकताच, कॅरिबियन प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमात सेंट ल्युसिया स्टारसाठी तो खेळला आहे.

२. थिसारा परेरा

श्रीलंकेचा हा एक स्फोटक फलंदाज जो की मधल्या फळीत जोरदार फलंदाजी करू शकतो. त्याशिवाय, तो गोलंदाजी देखील करू शकतो .२०१२मध्ये श्रीलंकेसाठी त्याने हॅट्रिक घेतली आहे असे करणारा तो श्रीलंकेचा ७वा गोलंदाज आहे.

कोलंबोच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या २०१६मध्ये कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. तो वनडे आणि टी-२०मध्ये श्रीलंकेकडून अजूनही खेळत आहे. त्याने नुकताच नॅटवेस्ट टी 20 ब्लास्टमध्ये ग्लॉस्टरशायरया संघाचे प्रतिनिधित्व केला आहे आणि भारताविरुद्धच्या एकमे टी -20 सामन्यातही तो खेळला आहे.

१. सॅम्युएल बद्री

वेस्ट इंडिजमध्ये जन्माला आलेल्या सर्व फिरकी गोलंदाजांमध्ये सॅम्युएल बद्री हा सर्वात प्रभावी लेग स्पिनर आहे असे मानले जाते. तो एक टी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. तो जगभरातील विविध फ्रँचाइजीजसाठी या फॉर्मेट मध्ये खेळतो. १७६ टी-२० विकेट्स आणि ६ पेक्षा कमी इकॉनॉमी हे बद्रीचे या खेळातील कौशल्य दाखूवन देते.

बद्री जास्त करून पॉवर प्ले मधेच गोलंदाजी करतो. बद्री चेंडू जास्त स्पिन करत नाही पण चेंडूच्या लाईन आणि लेन्थवर त्याच चांगल नियंत्रण आहे. त्यामुळेच त्याच्या विरुद्ध फलंदाजी करणे अवघड जाते.

२००९मध्ये बद्रीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि टी-२० मध्ये लक्ष केंद्रित केले.