अशी खिलाडूवृत्ती तुम्ही याआधी पाहिली आहे का ?

लाहोर। आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेर पाकिस्तानात परतले. मंगळवारी गद्दाफी स्टेडियम लाहोरमध्ये विश्व ११ आणि पाकिस्तान यांच्यात इंडिपेन्डेन्स कपचा पहिला सामना खेळण्यात आला. ज्यात पाकिस्ताने विश्व इलेव्हन संघावर मात केली. बाबर आझमने५२ चेंडूत ८६ धावा फटकावल्या आणि पाकिस्तानची धावसंख्या १९७ पर्यंत नेली. प्रतिउत्तर देताना विश्व् ११ चा संघ २० षटकांत १७७ पर्यंतच मजल मारु शकला.

पाकिस्तान आणि विश्व ११ संघाच्या या सामान्यदरम्यान खिलाडूवृत्तीचे दर्शन झाले. विश्व् ११ साठी खेळणाऱ्या डॅरेन सॅमीला पाकिस्तानच्या हसन अलीने जबरदस्त यॉर्कर टाकला ज्यामुळे सॅमी बाद झाला नाही पण खाली पडला. अली लगेचच त्याला उचलण्यासाठी त्याच्या जवळ गेला पण सॅमी तोपर्यंत पडलेल्या जागेवरूनच त्याच्या गोलंदाजीची कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवू लागला.

या खेळाडूवृत्ती बद्दल क्रिकेट चाहत्यांनी या कॅरेबियन क्रिकेटरचे ट्विटरवरून खूप कौतुक केले.