असा असेल आजच्या टी२० सामन्यासाठी संघ

आयसीसी सध्या पाकिस्तान देशात क्रिकेट पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून या देशात वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या देशातही क्रिकेटप्रेमी चाहते याची मोठ्या प्रमाणावर गेली ९ वर्ष वाट पाहत होते.

वर्ल्ड ११ संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा तिन्ही प्रकारातील कर्णधार फाफ डुप्लेसी करत असून प्रशिक्षकपदी इंग्लंडच्या अँड्रू फ्लिंटॉफची निवड झाली आहे. १५ सदस्यीय संघात किती खेळाडूंना आज संधी मिळेल हे लवकरच समजणार आहे. १५ सदस्यीय संघात ५ खेळाडू आफ्रिकेचे, ३ खेळाडू ऑस्ट्रेलियाचे, २ खेळाडू विंडीजचे तर इंग्लंड. बांगलादेश, श्रीलंका आणि न्युझीलँड संघाचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत.

यातून निवडला जाणार वर्ल्ड ११ संघ:

फाफ डुप्लेसी (दक्षिण आफ्रिका आणि कर्णधार), हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका), जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया), पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड ), बेन कटिंग (ऑस्ट्रेलिया), ग्रॅण्ट एलिट (न्युझीलँड), तमाम इकबाल (बांगलादेश ), डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका), टीम पेन (ऑस्ट्रेलिया), थिसारा परेरा (श्रीलंका), डॅरेन सॅमी (विंडीज), सॅम्युएल बद्री (विंडीज ), मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका), इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका),