म्हणून श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध हरणार?

काही दिवसांपूर्वी झैनाब अब्बास ही पाकिस्तानी स्पोर्ट्स रिपोर्टर ट्विटर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. त्याच कारण म्हणजे तिने ज्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स बरोबर सेल्फी ट्विटरवर प्रसिद्ध त्या दोनही सामन्यात हे खेळाडू ० धावसंख्येवर बाद झाले. एवढंच नाही तर त्या सामन्यात दोघांचेही संघ पराभूत झाले.

आता या पाकिस्तानी स्पोर्ट्स रिपोर्टरने सेल्फी प्रसिद्ध केला आहे तो थेट श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूबरोबर. कारण पुढचा सामना होणार आहे तो पाकिस्तान श्रीलंका संघात. या सामना दोनही संघांसाठी करो या मरो असा आहे.  आधीच्या सामन्यातही भारताचा कर्णधार विराट हा मुख्य फलंदाज होता तर दुसऱ्या सामन्यात एबी डिव्हिल्लीर्स कर्णधार आणि आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज होता. योगायोग म्हणजे अँजेलो मॅथ्यूबरोबर हाही श्रीलंकेचा कर्णधार असून त्यांचा मुख्य फलंदाज आहे.

झैनाब अब्बासने या सेल्फीबरोबर एक कंमेंटसुद्धा केली आहे ज्यात ती म्हणते, ” लोकांच्या अपेक्षेप्रमाणे (पब्लिक डिमांड ) मी हा सेल्फी शेअर करत आहे. मी माझं काम केलं आहे. आता पाकिस्तान संघाने त्यांचं काम करून विजय मिळवून द्यावा. ”

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान हा सामना आज दुपारी ३ वाजता असून जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीच तिकीट मिळणार आहे.