अझहर अलीने मानले कोहली, धोनी, युवीचे आभार

पाकिस्तानच्या अझहर अलीने आज ट्विटरच्या माध्यमातून काही भावनिक क्षण शेअर केले आहेत. ज्यात भारतीय खेळाडूंनी अझहर अलीच्या मुलांबरोबर गप्पा मारल्या तसेच फोटो काढले आहेत.

३२ वर्षीय अझहर अली पाकिस्तान संघाकडून सलामीवीर म्हणून खेळतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने ५९ धावांची जबदस्त खेळी केली. परंतु फकर झमान बरोबर धावा घेत असताना तो धावबाद झाला

अझहर अलीच्या मुलांबरोबर या छायाचित्रांमध्ये भारताचा कर्णधार एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दिसत आहेत.

अझहर अली म्हणतो, ” माझ्या मुलांबरोबर वेळ घालवल्याबद्दल या दिग्गज खेळाडूंचं मनापासून आभार. माझी मुलं या दिग्गजांना भेटून खूप आनंदी आहेत. ”

प्रथमच भारत पाकिस्तान सामन्यानंतर खेळाडूंमध्ये एवढे मैत्रीपूर्ण संबंध पुढे आले आहेत. रोज या दोन संघातील खेळाडूंच्या मैत्रीच्या बातम्या पुढे येत आहेत. खेळाडू जरी असे मैत्रीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असले तरी काही हुल्लडबाज प्रेक्षकांकडून या मैत्रीला गालबोट लावण्याचं काम केलं जात आहे.