पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स व पॅलॅडियन्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स व टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स या संघांनी अनुक्रमे युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स व एमपी ग्रुप मावरिक्स संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

बावधन येथील गंगा लिजेंड्स फुटबॉल मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पृथ्वीराज सातव(2, 6मि.) व धीरेन भतिजा(9,13मि.) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने एमपी ग्रुप मावरिक्स संघाचा 4-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स संघाने युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्सचा 2-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून निखिल माळी व यश सरदेसाई यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स: 2(निखिल माळी 2मि, यश सरदेसाई 14मि.)वि.वि.युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 0;

द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स: 4(पृथ्वीराज सातव 2, 6मि, धीरेन भतिजा 9,13मि.)वि.वि.एमपी ग्रुप मावरिक्स: 0.