हार्दिक पंड्या बनू शकतो कपिल देव: इयान चॅपेल

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा भारतासाठी कपिल देवने जे केले ते करू शकतो असे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार इयान चॅपेलने व्यक्त केले आहे.

“भारताला कपिल देवनंतर एकही चांगला अष्टपैलू खेळाडू लाभला नाही. पण हार्दिक पंड्या हा उत्तम अष्ठपैलू खेळाडू आहे आणि पंड्या हा असा खेळाडू आहे जो की गोलंदाजीबरोबर फलंदाजी ही उत्तम करू शकतो. एकेकाळी कपिल देव भारतासाठी ही कामगिरी करायचे.” असे इयान चॅपेल म्हणाले.

मागील काही सामन्यात हार्दिकने भारताकडून फलंदाजी आणि गोलंदाजमध्ये उत्तम कामगिरी केले आहे. टी२० पासून सुरुवात केलेल्या या खेळाडूने वनडे आणि कसोटीमध्येही संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.

“पंड्यासारखा खेळाडू, जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो आणि १४० किलोमीटर्सच्या वेगाने चेंडू टाकण्याची ही क्षमताही ठेवतो, यामुळे सर्व प्रकारच्या परिस्थितीत यशस्वी होण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. “

“भारत हा आता खरोखरच चांगला संघ बनला आहे, त्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सारख्या अत्यंत स्पर्धात्मक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे. जर पंड्या आपल्या गोलंदाजीला त्या परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी अनुकूल बनवू शकला तर भारतीय उपखंडाच्या बाहेर पण तो सतत चांगली कामगिरी करेल.” असे इयान चॅपेल म्हणाले.