युएफा चॅम्पियनशीप: पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचचा ३-० असा केला पराभव

युएफा चॅम्पियनशीपच्या ‘ग्रुप बी’ मधील सामन्यात पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचला ३-० असे हरवले. अवे सामना खेळणाऱ्या बायर्न म्युनिचला या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. पीएसजी संघाकडून डॅनी अल्वेस, एडींसन कवानी आणि नेमार जुनियर यांनी गोल केले.

सामन्याच्या पहिल्या सत्रात सुरूवातीलाच पीएसजी संघाने अक्रमने सुरु केली. याचा फायदा त्यांना सुरुवातीलाच मिळाला. नेमारने बायर्नच्या क्षेत्रात उत्तम चाल रचली आणि बॉल डॅनी अल्वेसला दिला. त्याने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत पीएसजी संघाला आघाडी मिळवून दिली. या गोल नंतर बायर्न संघाने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. थॉमस मुलरने हेडर केला परंतु तो गोल जाळ्यावर ठेवण्यात तो अपयशी ठरला. यांनंतर बायर्नच्या मार्टिनेजने एक व्हॅली लगावली परंतु ती थोपवण्यात पीएसजीच्या गोलकिपर अल्फ़ोंसे एरियओलाला यश आले.

नेमार, कवानी आणि मबापे या त्रिकुटाचा खेळ आज खूप बहरात होता. मबापेने एक सुरेख पास कवानीला दिला आणि कवानीने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. या गोल नंतर पीएसजी संघाची २-० अशी आघाडी झाली. दुसऱ्या सत्रात पुन्हा बायर्न संघाने अक्रमक पवित्रा घेतला. या वेळी मार्टिनेजने मारलेला हेडर गोल लाईनवर उभ्या असलेल्या डॅनी अल्वेसने परतावून लावला.

मबापे याला राईट विंगवर रोखणे बायर्न संघासाठी खूप मोठे आव्हान होते. मबापे याने राईट विंगवरून एक उत्तम चाल रचत स्वतःसाठी गोलची उत्तम संधी निर्माण केली. दोन डिफेंडर्सला चुकवल्यानंतर त्याला गोल करण्यात अपयश आले. त्याने मारलेला बॉल डिफेक्ट झालं आणि त्यावर नेमारने गोल करत पीएसजी संघाची आघाडी ३-० अशी केली. यानंतर दोन्ही संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रयन्त केले गेले परंतु त्यात कोणत्याही संघाला यश आले नाही. त्यामुळे हा सामना ३-० अश्या गोल फरकावरच थांबला. या विजयासह पहिल्या लेगमध्ये पीएसजीने बायर्न म्युनिच संघावर ३-० अशी बढत मिळवली आहे.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# पीएसजी संघाने युएफा चॅम्पियनशीपच्या मागील ९ पैकी ८ सामन्यात कमीतकमी प्रत्येकी २ गोल केले आहेत.

# हे दोन संघातील शेवटची लढत २००१ साली झाली होती. त्या वर्षी बायर्न संघाने युएफा चॅम्पियनशीप जिंकली होती.

# पीएसजी संघाने घरच्या मैदानावर युएफा चॅम्पियनशीपचे सामने खेळताना मागील ४४ सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारला आहे.

# या सामन्यात गोल नोंदवल्यानंतर एडींसन कवानी हा केवळ ५वा खेळाडू ठरला आहे ज्याने युएफा चॅम्पियनशीपच्या सलग सहा सामन्यात गोल नोंदवलं आहे.

#या सामन्याअगोदर बायर्न संघाच्या अर्गेन रॉबेनने पीएसजी संघावर आणि त्यांच्या संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर टिप्पणी केली होती. यात तो म्हणाला की, पीएसजीच्या काही खेळाडूला मिळणारे मानधन जरी जास्त असले तरी त्यांना मैदानात गोल करावे लागतील. या सामन्यात पहिल्या काही मिनिटामध्येच पीएसजी संघाने गोलचे खाते उघडले.

# या सामन्यापूर्वी बायर्नने युएफा चॅम्पियनशीपच्या सहा सामन्यांपैकी ५ सामने जिंकले होते. या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.