पार्थिव पटेलने केली सेहवागची बोलती बंद

केप टाउन । भारतीय संघाचा माजी कर्णधार सेहवाग आपल्या ट्विटरवर खास शैलीमुळे क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. सेहवाग अनेक वेळा खास ट्विट करून मोठया मोठ्या क्रिकेटपटूंची बोलती बंद करतो. परंतु काल सेहवागच्या असाच एक ट्विटवर भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने बोलती बंद केली आहे.

सेहवागने एक ट्विट करत लिहिले, ” नई नवेली दुल्हन आयीz पति बोला अपने हाथ की रोटी बना के खिलाओ ।”

पुन्हा या ट्विटमध्ये पार्थिवला टॅग केले आणि दक्षिण आफ्रिकेत त्याच्याकडे ग्लव्ज आहेत की पाठवू असे विचारले.

यावर पार्थिवनेही माघार न घेता खास उत्तर दिले. “माझ्या मापाचे अनेक ग्लव्ज मी घेऊन आलो आहे इकडे वीरू भाई. त्यांना तिकडेच ठेवा. दिल्लीत थंडी खूप वाढली आहे. तिकडे तुमच्या कामाला येईल.”