अबब! तब्बल १७ वर्षानंतर पार्थिव पटेल खेळतोय आशियाबाहेर

सेन्चुरियन। दुसऱ्या कसोटी सामन्यात यष्टिररक्षक म्हणून संधी देण्यात आलेला पार्थिव पटेल तब्बल १७ वर्षानंतर आशिया खंडाबाहेर कसोटी सामना खेळत आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना आशिया खंडाबाहेर २००४मध्ये १८ वर्ष आणि २९९ दिवसांचा असताना खेळला होता.

पार्थिव पटेलचा हा कसोटी कारकिर्दीतील २४वा सामना आहे. तो जेव्हा आपला शेवटचा सामना आशिया खंडाबाहेर खेळला होता तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात नाबाद २४१ धावा केल्या होत्या. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झाला होता. तो स्टिव्ह वॉचा शेवटचा कसोटी सामना होता तर सध्या भारतीय संघातून खेळत असलेल्या कोणत्याही खेळाडूने तेव्हा पदार्पण केले नव्हते.

पार्थिव पटेलची कसोटी कारकीर्द आता तब्बल साडे पंधरा वर्षांची झाली आहे. पार्थिवने आजपर्यंत २४ कसोटीत ३३.७६च्या सरासरीने ८७८ धावा केल्या आहेत. पार्थिवला कसोटीत शतक करण्यात मात्र अपयश आले आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोर कसोटीत ७१ राहिला आहे.