द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मेहा पाटील, रिशिता पाटील यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे । नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या द क्रिएशन करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात मेहा पाटील, रिशिता पाटील, इमान विरजी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात मेहा पाटीलने पाचव्या मानांकित अद्विता गुप्तावर 6-1 असा सनसनाटी विजय मिळवला. इमान विरजी हिने सातव्या मानांकित स्वनिका रॉयचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून तिसरी फेरी गाठली. बिगरमानांकित
रिशिता पाटीलने आठव्या मानांकित ध्रुवी आदयंताला 6-0 असे नमविले. आदिती सागवेकरने श्रावणी देवरेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 10वर्षाखालील मुली:
आदिती सागवेकर वि.वि.श्रावणी देवरे 6-4;
रित्सा कोंडकर वि.वि.किया तेलंग 6-0;
मेहा पाटील वि.वि.अद्विता गुप्ता(5) 6-1;
सिद्धी मिश्रा वि.वि.वीरा हरपुडे 6-0;
अनन्या भुतडा वि.वि.वैष्णवी नागोजी 6-1;
इमान विरजी वि.वि.स्वनिका रॉय(7) 6-2;
रिशिता पाटील वि.वि.ध्रुवी आदयंता(8) 6-0;
काव्या पांडे वि.वि.आरोही देशमुख 6-3;
ह्रितिका कापले(4) वि.वि. वसुंधरा भोसले 6-2