प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड

पाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.

२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.

तयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.

यावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण हंगाम १३ आठवडे चालणार आहे.

अनुपम गोस्वामी जे या स्पर्धेचे कमीशनर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आॅगस्ट महिन्यात एशियन गेम्स होत असल्याकारणाने या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामुळे भारताच्या स्टार खेळाडूंबरोबरच विदेशातीलही दिग्गज भाग घेऊ शकतात. यामुळे सण-उत्सवाच्या काळात चाहत्यांना स्पर्धेचा आनंद घेता येईल.

कबड्डीमधील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा कबड्डीसाठीचे देशातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १चे वेबपोर्टल महा स्पोर्ट्स. तसेच आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फाॅलो करायला विसरु नका.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार काम

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…