प्रो कबड्डी: घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सवर आली सलग पाच सामने हरण्याची नामुष्की

प्रो कबड्डीमध्ये ११वा सामना तेलुगू टायटन्स आणि पटणा या दोन संघात झाला. रेडरचा बोलबाला झालेल्या या सामन्यात पाटणा पायरेट्स संघाने ४३-३६ अशी बाजी मारली. या सामन्यात पटणाचा कर्णधार असणाऱ्या दीपक नरवालने आणि मोनू गोयत हे पटणाच्या विजयात चमकले तर तेलुगूसाठी राहुल आणि राकेश यांनी चांगली कामगिरी केली.

पटणाच्या पहिल्याच रेडमध्ये प्रदीप नरवालने गुण मिळवला तर प्रतिउत्तरात रेडसाठी आलेला राहुल चौधरी पहिल्याच रेडमध्ये बाद झाला. पण नंतर लगेच पाटणाचा खेळाडू बाद झालं आणि राहुल लवकर मैदानात आला. ७ व्या मिनिटाला सामना ६-६ असा बरोबरीत आला. दोन्ही संघातील मुख्य रेडरने रेडींगमध्ये गुण मिळवत सामना १३व्या मिनिटाला १२-१२ असा बरोबरीत आणला. १६ व्या मिनिटाला तेलुगूचा संघ ऑलआऊट झाला आणि सामन्यातील गुणफरक १५-१९ असा झाला. पहिले सत्र संपले तेव्हा पाटणाचा संघ १६-२३ असा आघाडीवर होता.

दुसरे सत्र हे देखील रेडरच्या नावावर राहिले. या सत्रात दोन्ही संघ एक-एक वेळेस ऑलआऊट झाले. या सत्रात ३३ व्या मिनिटाला पटणा २२-४० असा पुढे होता. पण नंतर पटणा ३६व्या मिनिटाला ऑलआऊट झाली आणि सामना ३०-४० अश्या गुण फरकावर येऊन ठेपला. तेलगू टायटन्स संघाला सामन्यात परतण्याची संधी मिळाली, पण मोनू गोयतने केलेल्या शेवटच्या काही रेड निर्णायक ठरल्या. पटणाने सामन्यात मिळवलेली बढत कमी करण्यात तेलगू
टायटन्सला अपयश आले आणि पटणा पायरेट्सने सामना ३६-४० अश्या गुण फरकाने जिकला.