पॉल पोग्बा याने त्याचे विश्वविजेतेपदाचे गोल्ड मेडल दिले या व्यक्तीला

21वा फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा मिडफिल्डर पॉल पोग्बा याने त्याचे विजेतेपदक त्याच्या आईला दिले आहे. हे पोग्बाने इंन्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या सत्रात सांगितले.

सध्या मॅंचेस्टर युनायटेड स्टार पोग्बा हा सुट्ट्यांचा आनंद घेत असून तो जेव्हा घरी परतेल तेव्हा आईने हे विजेतेपद परत द्यावे अशी आशाही त्याने व्यक्त केली.

तसेच या स्पर्धेदरम्यान त्याने केस न रंगवताना खेळावर अधिक लक्ष दिले हे सांगताना त्याने त्या पाठीमागील कारणही स्पष्ट केले. फुटबॉलचे अभ्यासक हे तुम्ही मैदानावर कसे खेळता यावर लक्ष देतात, असे कारण त्याने सांगितले.

पोग्बासाठी त्याची आई येओ मोरीबा आणि त्याचे भाऊ फ्लोरेंटीन आणि मॅथिअस हेच कुटुंब आहे. त्याने या सगळ्यांना पुरस्कार वितरणानंतर मैदानावर बोलवून एकत्र त्याची प्रसिद्ध डॅब स्टाईल केली.

रशियात झालेल्या या स्पर्धेत त्याने एक गोल केला तो ही क्रोएशिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात. या सामन्यात जरी एंटोनी ग्रिझमनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला असला तरी पोग्बा हा या मैदानावरील उत्कृष्ठ खेळाडू ठरला. यावेळी त्याने क्रोएशियाच्या खेळाडूंचे हल्ले चांगलेच रोखले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी- संयुक्त राष्ट्राचे प्रमाणपत्र मिळवणारा हा ठरला पहिलाच फुटबॉल क्लब

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी