बार्सिलोनाचा निसटता विजय

-नचिकेत धारणकर

गेटाफे विरुद्ध बार्सिलोनाच्या सामन्यात गेटाफेने बार्सिलोनाचा चांगलाच घाम काढला. पण बार्सिलोना सामना जिंकत महत्वपूर्ण ३ गुण मिळवले आणि गुणतालिकेत प्रथम स्थान कायम ठेवले.

पहिल्या हाफमध्ये गेटाफेने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत बार्सिलोनाला हे सहजासहजी नाही जिंकता येणार दाखवून दिले. ३९ व्या मिनीटला गेटाफेची फ़्री किक बार्सिलोनाने रोखली पण तो बॉल बॉक्सच्या बाहेर असलेल्या शिबासकीने डाव्या पायाने वॉली मारत उजव्या वरच्या कॉर्नरला मारत अनपेक्षित आणि अविश्वसनीय गोल केला. शेवटच्या मिनीटला मेस्सी ने मिळालेली फ्री किक डाव्या कोपर्यात मारली पण गेटाफेच्या गोल कीपरने उत्तम सेव केला.

दूसर्या हाफ़ला बार्सिलोनाने इनिएस्टाला बसवुन डेनीस सुवारेजला पाठवले. ६३ व्या मिनीटला गेटाफेच्या पेनल्टी बॉक्स जवळ असलेला बॉल राॅबर्टोने डेनिसकडे दिला आणि त्याने तो डाव्या कोपर्यात मारत बार्सिलोनाला १-१ असे बरोबरीत आणले.

७८व्या मिनीटला राकिटिकला ब्राझीलचा पाॅलिन्होने रिपलेस केले. ८५ मिनिटला मेस्सीने गेटाफेच्या २ प्लेअर्सला चकवत बॉल पेनल्टी बॉक्सच्या जवळ असलेल्या पाॅलिन्होला दिला आणि त्याने काही चुक न करता बार्सिलोनासाठी आपला पहिला आणि आजचा बार्सिलोनाचा दुसरा गोल करत १-२ अशी अजेय बढ़त मिळवुन दिली.

आजच्या सामन्यात ६ येलो कार्ड दिले त्यात ४ बार्सिलोना तर २ गेटाफेच्या खेळाडुंना दिले.