पवनकुमार शेरावतला आज प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी

पुणे | बेंगलुरु बुल्सचा स्टार रेडर पवनकुमार शेरावतला प्रो कबड्डीत आज एक खास विक्रम करण्याची संधी आहे. त्याने आज जर रेडिंगमध्ये १६ गुण घेतले तर रेडिंगमधून १५०गुण घेणारा तो या हंगामातील पहिलाच खेळाडू ठरेल.

पवनकुमारने या हंगामात एकूण ११ सामने खेळले असून त्यात त्याने १४२ गुण कमावले आहे. यातील १३४ गुण त्याने केवळ रेडिंगमधून घेतले आहेत.

तसेच एकाच हंगामात १५० गुण रेडिंगमधून करणारा तो १२ खेळाडू ठरेल. यापुर्वी परदिप नरवाल (२०१७), रोहित कुमार (२०१७), अजय ठाकूर (२०१७), मोनू गोयत (२०१७), राहुल चौधरी (२०१७, २०१४), मनिंदर सिंग (२०१७), दिपक हुडा (२०१७), नितीन तोमर (२०१७), अनुप कुमार (२०१४), सचिन (२०१७) आणि रिशांक देवाडिगा (२०१७) यांनी अशी कामगिरी केली आहे.