अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी

पुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात गार्गी पवार हिने दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत गुजरातच्या बिगरमानांकित मोहित बोद्रेने हरियाणाच्या अव्वल मानांकीत सुशांत दबसचा 7-5, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवचा 7-6(6), 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीत सुशांत दबस व उदित गोगोई यांनी आर्यन भाटिया व डेनिम यादव यांचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने अव्वल मानांकित आपली राज्य सहकारी सुदिप्ता कुमारचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित गार्गी पवारने दुसऱ्या मानांकित बेला ताम्हणकरचा 6-2, 6-4असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात गार्गी पवारने बेला ताम्हणकरच्या साथीत पवनी पाठक व आईरा सूद यांनी 6-1, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेतील दुहेरी गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 25एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 20एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी विक्रम बोके, बंडूशेठ बालवाडकर आणि तुषार पडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष वेंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:उपांत्य फेरी: मुले: 
मोहित बोद्रे(गुजरात)वि.वि. सुशांत दबस(हरियाणा)(1) 7-5, 6-1;
आर्यन भाटिया(महा)(4)वि.वि.डेनिम यादव(मध्यप्रदेश)(2)7-6(6), 6-3

उपांत्य फेरी: मुली: 
आकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि.सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र)(1)6-3, 6-4;
गार्गी पवार(महाराष्ट्र)(4) वि.वि.बेला ताम्हणकर(महाराष्ट्र)(2)6-2, 6-4

दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले:
आर्यन भाटिया/डेनिम यादव वि.वि.
राजेश कन्नन/उदित कंभोज 4-6, 6-4, 10-3;
सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि.आदित्य बलसेकर/कार्तिक सक्सेना6-3, 6-2;
अंतिम फेरी: सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आर्यन भाटिया/डेनिम यादव 6-2, 6-3;

दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुली:
गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. सुदिप्ता कुमार/आकांक्षा नित्तुरे 6-3, 1-6, 10-7;
पवनी पाठक/आईरा सूद वि.वि.साई दिया बालाजी/प्राची बजाज 6-3, 1-6, 10-7;
अंतिम फेरी: गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. पवनी पाठक/आईरा सूद 6-1, 6-4.