PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल

दिल्ली। प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) चौथ्या हंगामातील लिलावात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला बेंगळुरू रॅपटर्सने 80 लाखांत विकत घेतले. तर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या लिलावाच्या पहिल्या फेरीत कोणीच बोली लावली नव्हती. मात्र नंतर तिला नॉर्थ इस्टर्न वॉरियर्सने 80 लाखांत संघात घेतले.

तसेच पीव्ही सिंधूला हैद्राबाद हंटर्सने तर एचएस प्रणोयला दिल्ली डॅशर्सने 80 लाखमध्ये संघात घेतले आहे. भारतीय दुहेरीची स्टार खेळाडू सिक्की रेड्डीला अहमदाबाद स्मॅश मास्टर्सने 29 लाखमध्ये आणि अश्विनी पोनप्पाला अवध वॉरियर्सने 32 लाखांत संघात घेतले.

2018चे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या पी कश्यपला चेन्नईने पाच लाख या त्याच्या मुळ किमंतीत विकत घेतले. याआधी तो अवध वॉरीयर्सकडून खेळत होता.

2018एशियन ज्युनियर चॅम्पियन लक्ष्य सेनला पुणे 7 एसने 11 लाखांत संघात घेतले. त्याच्यासाठी हैद्राबादनेही बोली लावली होती मात्र पुण्याने यात बाजी मारली. पुणे संघ या लीगमध्ये पदार्पण करत असून त्यांनी स्पेनच्या कॅरोलिना मारीनला या स्टार खेळाडूलाही 70 लाखांत संघात घेतले आहे.

तसेच डेन्मार्कच्या विक्टर अलेक्सनला अहमदाबादने 80 लाखांत विकत घेतले असून तो याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या संग जी ह्युनला चेन्नईने 80 लाखमध्ये संघात घेतले.

तसेच साई प्रणितला बेंगळुरूने 32 लाखमध्ये विकत घेतले आहे. त्याची मुळ किंमत 20 लाख एवढी होती.

यावेळी 23 देशांच्या 145 खेळाडूंनी या लिलावात सहभाग घेतला होता. पीबीएलचा हा चौथा हंगाम 22 डिसेंबर ते 13 जानेवारी या दरम्यान होणार आहेत. 23 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नऊ संघ असणार आहेत. तर 2015 नंतर प्रथमच खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

आसीसीच्या त्या नियमाने कर्णधार विराट कोहली वैतागला

दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटऐवजी या खेळाडूला मिळणार संधी?

कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला