टीम इंडियाला विंडीजमध्ये धोका, हल्ल्याच्या मेलमुळे टेन्शन वाढले

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. त्यांची 22 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पण हा दौरा सुरु असतानाच भारतीय संघाला मारण्याची धमकी देण्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील जीओ टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय संघावर हल्ला करण्याच्या धमकीचा एक अज्ञात इमेल शुक्रवारी आला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्वरित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला(आयसीसी) हा मेल पाठवला. या प्रक्रियेमध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळलाही (बीसीसीआय) या इमेलची एक कॉपी पाठवण्यात आली.

बीसीसीआयने या मेलबद्दल गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. तसेच भारतीय संघ सध्या अँटिग्वामध्ये असल्याने तेथील भारतीय दूतावासालाही ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना बीसीसीआयचे सीइओ राहुल जोहरी यांनी स्पष्ट केली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डालाही या धमकीबद्दल सांगण्यात आले आहे. वेस्ट इंडीज बोर्डानेही सर्वप्रकारे मदत करण्याचे अश्वासन दिले आहे. आता भारतीय संघाच्या बसबरोबर एक सुरक्षा वाहन देखील असणार आहे.

तसेच वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर या संबंधी बैठक घेतली आहे.

याबरोबरच भारतीय खेळाडूंनाही संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी या हल्ल्याच्या धमकीबद्दल माहिती दिली आहे. तसेच सर्व खेळाडूंना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

भारतीय संघाच्या या वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 आणि वनडे मालिका पार पडल्या आहेत. या दोन्ही मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आता कसोटी मालिका सुरु होणार असून पहिला कसोटी सामना अँटिग्वा येथे 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना जमैकाला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी ही ७ नावे झाली शॉर्टलिस्ट

व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, अर्धशतक करणारा स्मिथ आर्चरचा चेंडू लागल्याने मैदानाबाहेर

रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न