आयकॉन-अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीसीएलटीए, रुबी, एमडब्लूटीए ब संघांचे विजय

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीसीएलटीए, खतरनाक, रुबी,  एमडब्लूटीए ब  या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पीसीएलटीए संघाने लॉ चार्जर्स संघाचा 18-5असा सहज पराभव केला. सामन्यात 80अधिक गटात पीसीएलटीएच्या रवी जंकणीने निर्मल वाधवानीच्या साथीत लॉ चार्जर्सच्या नितीन गवळी व समीर बाफना यांचा 6-0 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीसीएलटीएच्या गिरीश कुलकर्णी व कल्पेश यांनी लॉ चार्जर्सच्या संदीप माहेश्वरी व राहुल मंत्री यांचा 6-5(7-5) असा तर, पीसीएलटीएच्या डॉ.मित्तल व आनंद गुप्ता या जोडीने लॉ चार्जर्सच्या नितीन खैरे व श्रीनिवास रामदुर्ग यांचा 6-0असा एकतर्फी पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात खतरनाक संघाने सोलारिस गो-गेटर्स संघावर 15-14अशा फरकाने संघर्षपूर्ण विजय मिळवला. रुबी संघाने सोलारिस क संघाचे आव्हान 18-2असे मोडीत काढले. एमडब्लूटीए ब संघाने एफसी क संघाचा 18-6असा पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीसीएलटीए वि.वि.लॉ चार्जर्स 18-5(80अधिक गट: रवी जंकणी/निर्मल वाधवानी वि.वि.नितीन गवळी/समीर बाफना 6-0; खुला गट: गिरीश कुलकर्णी/कल्पेश वि.वि.संदीप माहेश्वरी/राहुल मंत्री 6-5(7-5); डॉ.मित्तल/आनंद गुप्ता वि.वि.नितीन खैरे/श्रीनिवास रामदुर्ग 6-0);

खतरनाक वि.वि.सोलारिस गो-गेटर्स 15-14(80अधिक गट: मंदार कापशिकर/निलेश नाफडे वि.वि.वसंत साठे/आशिष कुबेर 6-4; खुला गट: महेश ए/अविनाश पवार वि.वि.संतोष शहा/अमोल गायकवाड 6-4; आशुतोष सोवनी/राहुल उप्पल पराभूत वि.अश्विन हळदणकर/आशय गोखले 3-6);

रुबी वि.वि.सोलारिस क 18-2(80अधिक गट: संजय बोथरा/रणजीत पांडे वि.वि.संभाजी शिंदे/सत्यजीत गुजर 6-1; खुला गट: केदार देशपांडे/मधुर इंगळहालीकर वि.वि.रवी भांडेकर/अभय कुलकर्णी 6-1; अभिजित खानविलकर/अमोल काने वि.वि.मंदार काळे/श्रीकांत पवार 6-0);

एमडब्लूटीए ब वि.वि.एफसी क 18-6(80अधिक गट: आशिष डिके/गजानन कुलकर्णी वि.वि.कपिल जे/सिद्धेश पी 6-2; खुला गट: श्वेतल शहा/आदित्य शहा वि.वि.सिद्धार्थ साठे/चिन्मय दांडेलकर 6-2; प्रमोद उमरजे/मंदार मेहेंदळे वि.वि.माही चितळे/धैर्यशील तावरे 6-2).